बीड

बीड जिल्ह्यात आज 44 रुग्ण पॉझिटिव्ह तर 45 कोरोनामुक्त!

बीड जिल्ह्याचं आतापर्यंतच सविस्तर कोरोना अपडेट!

20 Dece :- कोरोना विषाणूचा कहर काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी वाढती गर्दी मोठ्या संकटाला आमंत्रण देत आहे. तोंडावर मास्क न वापरता, सोशल डिस्टन्स न ठेवता सर्रासपणे नागरिक फिरताना दिसत आहेत. यामुळे आटोक्यात येत असलेला कोरोनाचा संसर्ग आता आणखी वरती तोंड काढू लागला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

नागरिकांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम लक्षात घेऊन खबरदारीच्या वागणे अत्यावशक आहे. आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवारी बीड जिल्ह्यात तब्ब्ल 45 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे. तर 44 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 16 हजार 426 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट सध्या 12.01 एवढा आहे. तर रिकव्हरी रेट 94.67 एवढा आहे. आजपर्यंत बीड जिल्ह्यातून 15 हजार 521 रुग्णांना कोरोनामुक्तीची पावती भेटली आहे. त्यामुळे नागरिकांनो कोरोनाला न घाबरता खबदारी घ्या, कोरोनाची सौम्य लक्षण आढळताच डॉक्टरांना भेटा!