भारत

गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा; लॉकडाउनमुळे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त!

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने पार केला कोटीचा आकडा

19 Dece :- देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने कोटीचा आकडा पार केलाय. शनिवारी यात नव्या 25,152 रुग्णांची भर पडलीय. यातून बरं झालेल्यांची संख्या आता 95.50 लाख इतकी झाली आहे. यावर आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. अनियोजित लॉकडाउनमुळे कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केलाय.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, “कोरोना संक्रमणाचे रुग्ण आता एक कोटीच्या वर गेलेत. त्यात जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. अनियोजित लॉकडाउनच्या माध्यमातून कोरोना विरोधातली ही लढाई 21 दिवसात जिंकता येते असं पंतप्रधानांनी देशाला सांगितलं होतं. परंतु यामुळं देशातील कोट्यवधी लोकांच जीवन उद्ध्वस्त झालं.”