1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केले जाणारे आगामी बजेट ‘अभूतपूर्व’ असेल
सरकार पीडीत अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देण्यासाठी तत्पर
19 Dece :- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असा विश्वास व्यक्त केला की, आता सादर केले जाणारे आगामी बजेट ‘अभूतपूर्व’ असेल, कारण सरकार महामारीमुळे पीडीत अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देण्यासाठी तत्पर आहे. त्या म्हणाल्या की, आरोग्य, वैद्यकीय संशोधन आणि विकास, टेलिमेडिसिनसाठी सर्वसमावेशक कौशल्य या सर्वांचा विकास महत्त्वाचा ठरणार आहे. यासह, रोजच्या जीवनाशी संबंधित आव्हानांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या नवीन दृष्टीकोनातून पहावे लागतील.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
सीआयआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सीतारामन शुक्रवारी बोलत होत्या. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘मला तुमच्या सूचना पाठवा जेणेकरून आम्ही असा अर्थसंकल्प तयार करू शकू. असा अर्थसंकल्प जो भारताच्या 100 वर्षात पाहिला नसेल, तो पँडेमिकनंतर सादर केला जाईल,व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सीआयआय पार्टनरशिप कॉन्फरन्स 2020 ला संबोधित करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ‘आणि हे तेव्हापर्यंत शक्य होणार नाही, जोपर्यंत मला तुमच्याकडून सूचना आणि इच्छांची यादी मिळणार नाही.’ अर्थमंत्र्यांनी असे देखील नमुद केले केले, ही आव्हान लक्षात आणून दिल्याशिवाय बजेटचा योग्य दस्तावेज तयार करणं अशक्य आहे, जे अभूतपूर्व असेल आणि पँडेमिकनंतर सादर केले जाणार आहे.
2021-22 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2021 रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, कोरोनामुळे प्रभावित झालेल्या आणि वृद्धीसाठी मदत करणाऱ्या क्षेत्रांचं समर्थन वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून विकास रुळावर आणता येईल. कोरोना काळात विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याचं काम केंद्र सरकार तसंच राज्यसरकारकडून सुरू आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय लवकरच तांत्रिक कापड आणि मानवनिर्मित कापड उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना जाहीर करू शकेल.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी असोचॅम कार्यक्रमात सांगितले की या क्षेत्रासाठी प्रोत्साहन योजनेचा रोडमॅप तयार केला जात आहे. अशाप्रकारे विविध क्षेत्रांना उभारी देण्याचं काम केलं जात आहे. पँडेमिकमुळे निर्माण झालेली स्थिती सुधारण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.