सिनेमा,मनोरंजन

कॅन्सरवरील उपचारानंतर संजू शूटिंगमध्ये व्यग्र

‘केजीएफ2’, भूज चित्रपटामध्ये झळकणार संजू

15 Dece :- गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सर सारख्या महाभयंकर रोगाशी झुंज देत असलेला संजू कॅन्सरवर मात करून आता एकदम तंदुरुस्त झाला आहे आणि आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये पूर्णतः व्यग्र झाला आहे. काही वर्षांपूर्वी आलेला KGF हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. याच चित्रपटाचा ‘केजीएफ2’ सिक्वेल बनवण्यात येत आहे. या चित्रपटासाठीही त्यानं शूटिंग सुरू केलं आहे. अग्निपथ चित्रपटामध्ये कांचा पात्राची दर्जेदार भूमिका वठवणारा संजू ‘केजीएफ2’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्याच्या अधीरा नावाच्या भूमिकेचा अवघड क्लायमॅक्स सीन सध्या चित्रित होत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

दाक्षिणात्य अभिनेता यश याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्त या चित्रपटात ‘अधीरा’ ही खलनायकाची भूमिका साकारात आहे. नायकाची भूमिका साकारणाऱ्या यशबरोबर होणाऱ्या जीवघेण्या मारामारीच्या प्रसंगात त्याचा अंत होतो. प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली दोन्ही अभिनेते हा अत्यंत महत्त्वाचा क्लायमॅक्सचा भव्य प्रसंग शूट करण्यासाठी सज्ज आहेत. नायक आणि खलनायक यांच्यातील अवघड स्टंटस असलेल्या या प्रसंगाचे शुटिंग सध्या टप्प्याटप्प्यात सुरू आहे.अनबु आणि अरीवू हे अॅक्शन डायरेक्टर्स या खास प्रसंगातील स्टंटससाठी काम करत आहेत. संजय दत्तही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास उत्सुक आहे.

कोळसा खाणीच्या पार्श्वभूमीवर हा भव्य प्रसंग शूट करण्यात येत आहे. संजय दत्तनं यासाठी बॉडी डबल वापरावा असा आग्रह चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याला केला होता, मात्र संजय दत्तनं स्वतःच हे स्टंटस करण्यावर भर दिला. ‘केजीएफ 2’चे शुटिंग या महिनाखेरपर्यंत चालणार असून, या प्रसंगाच्या शूटिंगबरोबर चित्रपटाचे शूटिंगही संपणार आहे. हे प्रसंग भव्य वाटावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हा सीन चित्रपटातील युएसपी (USP) ठरेल अशी दिग्दर्शकाला आशा आहे.

पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. तर याचा पहिला टीझर अभिनेता यश याच्या वाढदिवशी जानेवारी 2021 अर्थात पुढील महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. याच बरोबर ‘भूज : द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात संजय दत्त मुख्य गावकऱ्याच्या भूमिकेत असून, अजय देवगण एअरफोर्स पायलाटच्या मुख्य भूमिकेत आहे. ‘ भूज : द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचं हैद्राबाद इथं शूटिंग केलं.