महाराष्ट्र

कोरोना चाचणीचे दर आणखी कमी झाले

आरोग्य विभागानं घेतला निर्णय

15 Dece :- राज्यातील नागरिकांसाठी दिलादायक बातमी आहे. राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर आता आणखी कमी केले आहेत. कोरोना टेस्टची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्य़ात म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोनाची चाचणी फक्त 700 रुपयांमध्ये करता येणार आहे. कोणत्याही खासगी प्रयोगशाळेत चाचणी केल्यास आता इतकेच दर द्यावे लागतील. मार्च महिन्यात खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये दर निश्चित केला होता. मात्र प्रत्यक्षात अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात होते. त्यामुळे राज्य सरकारनं ही किंमत निर्धारित करण्याचा निर्णय घेतला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

टप्प्याटप्प्याने चाचणीचे दर कमी करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात 980 रुपये, त्यानंतर आणि आता 700 रुपये दर करण्यात आले आहेत. सुरुवातीला कोरोना चाचणीसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जायचे. अगदी सुरुवातीला खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे 5200 रुपये आकारले जात होते. नंतर त्यावर सरकारने नियंत्रण आणलं. राज्य सरकारने हे दर कमी केले आणि 4500 रुपयांऐवजी जास्तीत जास्त 2200 रुपये आणि घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी 2800 रुपये आकारण्यात आले.

राज्यात कोरोना रुग्णांचा घसरत असलेला आलेख सध्या कायम आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 4 हजार 395 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही 17 लाख 66 हजार 10 झाली आहे. राज्यांचा Recovery Rate 93.60 म्हणजेच 94 टक्क्यांच्या जवळ गेला असून हा उच्चांकी दर आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 442 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 70 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 18 लाख 86 हजार 807 झाली आहे. त्या पैकी 17 लाख 66 हजार जण बरे झाले. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून राज्यात सध्या 71 हजार 356 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतली 403 जणांनी कोरोनावर मात केली आहे.