भारत

घरगुती गॅस सिलेंडर महागला; मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

तेल कंपन्यांनी आज एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये केली वाढ

15 Dece :- तेल कंपन्यांनी आज एलपीजी गॅसच्या किंमतींमध्येवाढ केली आहे. 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे 5 किलोग्रॅमच्या सिलेंडरमध्ये 18 रुपयांची आणि 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 36.50 रुपयांची वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसी च्या मते दिल्लीमध्ये विना-सबसिडीच्या 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 644 रुपये झाली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

मुंबईमध्ये देखील हाच दर आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये विना-सबसिडीच्या 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत अनुक्रममे 670.50 रुपये आणि 660 रुपये आहे. याआधी 1 डिसेंबर रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी वाढ केली होती. 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरचे दर 55 रुपयांपर्यंत वाढवले होते. दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात HPCL, BPCL, IOC या कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली नव्हती. साधारणपणे महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅसच्या किंमतीत बदलाव केले जातात. मात्र या महिन्यात असं झालं नाही.

पहिल्या तारखेला आयओसीकडून सांगण्यात आले की, 14.2 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत या महिन्यात कोणताही बदल करण्यात आला नाही आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून या विना-सबसिडीच्या गॅस सिलेंडरच्या किंमती 594 रुपयांवर स्थीर होत्या, आता त्यामध्ये 50 रुपयांची वाढ होऊन दर 644 रुपये झाले आहेत.

1 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये हेच दर होते. दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत 594 रुपये होते. कोलकाता आणि चेन्नईमध्ये या किंमती अनुक्रमे 620.50 आणि 610 रुपये होत्या. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती माहित करुन घेण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावं लागेल. याठिकाणी कंपन्या दर महिन्याला नवीन रेट्स जारी करतात.