मोठी बातमी! अखेर कोरोनाला 100 टक्के थोपवण्यासाठी प्रभावी लस सापडली
रशियामध्ये काही जणांना लशीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला
14 Dece :- आतापर्यंत काही कोरोना लशींच्या ट्रायलचे अंतरिम परिणाम जारी करण्यात आले आहेत. या लशी जास्तीत जास्त 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. मात्र आता कोरोनाची 100 टक्के प्रभावी लसही सापडली आहे. विशेष म्हणजे या लशीचं भारतातही ट्रायल सुरू आहे. ही लस म्हणजे रशियाने तयार केलेली Sputnik V. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील अहवाल रशियानं जारी केला आहे. जो खूपच सकारात्मक आहे.
रशियन लस Sputnik V चं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. रशियामध्ये काही जणांना लशीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पहिला डोस दिल्यानंतर 21 दिवसांनी त्याचा परिणाम तपासण्यात आला. त्यानुसार ही लस 91.4% प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. गंभीर कोरोना प्रकरणांमध्ये ही लस 100 टक्के प्रभावी ठरली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेनं ही माहिती दिली आहे. याआधी अंतरिम अहवालात ही लस 92 टक्के परिणामकारक ठरल्याचं या देशाने सांगितलं होतं. मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्युन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे. रशियाची पहिली लस Sputnik V एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे.
या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती. रशियन वृत्तसंस्था TASS च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी ही लस अगदी कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. इतर कोरोना लशींपेक्षा आपली लस स्वस्त असल्याचा दावा रशियानं केला आहे.
या लशीचं इतर देशात उत्पादन घेणाऱ्या भागीदारांसह रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) आपला करारही विस्तारीत केला आहे. 2021 पर्यंत 500 दशलक्षपेक्षा अधिक लोकांसाठी लशीचं उत्पादन घेण्याचं उद्देश आहे. भारतातील डॉ. रेड्डीज कंपनीनं रशियन लशीसाठी RDIF शी करार केला आहे. भारतात या लशीचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.