भारत

मुख्यमंत्र्यांची घोषणा! ‘या’ राज्यात मिळणार मोफत कोरोना लस

मोफत देण्याची घोषणा करणारे तिसरे राज्य ठरले

12 Dece :- केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज करोना लशीसंदर्भात एक मोठी घोषणा केली. केरळमध्ये करोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. केरळमध्ये आज दिवसभरात ५ हजार ९४९ नवे करोनाबाधित आढळले. तर, मागील २४ तासांमध्ये ५९ हजार ६९० नमूने तपासले गेले. याशिवाय ५ हजार २६८ जण करोनातून बरे झाल्याचेही सांगण्यात आले. केरळमधील करोनातून बरे झालेल्यांची संख्या आता ६ लाख १ हजार ८६१ झाली आहे. तर, सध्या ६० हजार २९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे करोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा करोनावरील लस आली की ती राज्यातील नागरिकांना मोफत दिली जाईल. यानंतर मध्यप्रदेशकडून देखील ऑक्टोबरच्या शेवटी अशाचप्रकारची घोषणा केली गेली. देशात करोनावरील लस निर्मितीचे कार्य जोरात सुरू आहे. जेव्हा ही लस तयार होईल. तेव्हा मध्यप्रदेशमधील प्रत्येक नागरिकास ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल. असं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विटद्वारे जाहीर केलं होतं.

दरम्यान, करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे प्राण गमावले आहेत. जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे. तसेच, ब्रिटननंतर आता अमेरिकेनंही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या करोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली आहे.

सुरूवातीपासूनच अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसत आहे. जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत २ लाख ९२ हजार जणांनी आपले प्राण गमावले आहेत.