महाराष्ट्र

महाराष्ट्राचे कोरोना अपडेट; 3943 रुग्ण कोरोनामुक्त!

4259 जणांना कोरोनाची लागण झाली तर 80 जणांचा झाला मृत्यू

12 Dece :- राज्यात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. गेल्या 24 तासात राज्यात 4259 जणांना कोरोनाची लागण झाली असून 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या राज्यात 73542 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून पुण्यात कोरोनाचे सर्वाधित सक्रिय रुग्ण आहे. पुण्यात सध्या 16603 सक्रिय रुग्ण असून त्यानंतर ठाण्यात 13230, मुंबई 12520 आणि नागपूर 5054 सक्रिय रुग्ण आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आज राज्यातून 3943 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून 80 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आजचा मृत्यूचा आकडा कमी आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 93.46 इतका आहे. कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. लस उत्पादक कंपन्यादेखील लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यूकेमध्ये कोरोना लशीचा आपात्कालीन वापर सुरू झाल्यानंतर भारतातही तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत.

त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सीरमनं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे. लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच DCGI कडे अर्ज केला आहे. याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना लशीकरण सुरू होईल अशी खूशखबर अदार पूनावाला यांनी दिली आहे.