तरीही हिटमॅनच खेळणं अनिश्चितच
रोहितच्या फिटनेसवर लक्ष ठेवले जाणार
12 Dece :- भारतीय क्रिकेट संघातील स्टार ओपनर रोहित शर्माने बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस टेस्ट पास केली. आता रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळण्यास सज्ज झाला आहे. रोहित चार पैकी अखेरच्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकतो. पण अखेरच्या दोन कसोटी सामने खेळण्याआधी रोहितच्या फिटनेसवर लक्ष ठेवले जाणार आहे आणि त्याच्या फिटनेसची पुन्हा एकदा चाचणी घेतली जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने शनिवारी ही माहिती दिली.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
रोहित शर्मा शनिवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली. त्याच बरोबर रोहितच्या फिटनेस संदर्भात त्यांनी काही अपडेट दिले. NCA मध्ये रोहितने रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया पूर्ण केली असून तो आता फिट आहे. एनसीएच्या वैद्यकीय टीमने रोहितच्या फिजिकल फिटनेसची चाचणी घेतली आणि ते समाधानी आहेत. रोहित फलंदाजी, फिल्डिंग आणि विकेटच्या दरम्यान धावने याबाबत पूर्ण फिट आहे. आता त्याला फिटनेस कायम राखावा लागले. ऑस्ट्रेलियातील क्वारंटाइनच्या कालावधी रोहितसाठी एक कार्यक्रम तयार केला जाईल.
या कार्यक्रमाचे दोन आठवडे त्याला पालन करावे लागले. क्वारंटाइन पूर्ण झाल्यानंतर रोहितची पुन्हा फिटनेस चाचणी घेतली जाईल. ज्यामुळे त्याच्या फिटनेसबद्दलची स्थिती समजून घेता येईल. यानंतरच बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील अखेरच्या दोन सामन्यात त्याचा समावेश करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल. रोहित शर्मा १९ नोव्हेंबरपासून एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन आणि ट्रेनिंग घेत आहे. आयपीएलचा १३वा हंगामात रोहितला हॅम्स्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर तो फिट झाला होता आणि मुंबई इंडियन्स कडून अखेरच्या ३ लढती खेळला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पाचव्यांदा विक्रमी विजेतेपद मिळवले होते.