सिनेमा,मनोरंजन

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठकचा पार पडला विवाह सोहळा

भारती सिंहने केलेला डान्स व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

12 Dece :- डान्स इंडिया डान्स’ या शोमधून प्रकाशझोतात आलेला ॲक्टर आणि कोरिओग्राफर पुनीत पाठकने गर्लफ्रेंड निधी मूनी सिंहशी लग्नगाठ बांधली. लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला पुनीत पाठक याच्या काही निवडक मित्रांनी हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये दोघेही लग्नाचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पुनीत आणि निधी या दोघांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसून येत आहेत.
मंगळवारी पुनीतने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या लग्नाची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्याने ही तारीख आयुष्यभर आमच्यासोबत राहणार आहे. 11 डिसेंबर या दिवशी आमचे आयुष्य बदलणार असून आमच्या आयुष्यातील नवीन काळ सुरु होणार आहे. असं लिहीलं होतं.

निधी सिंह हिला या पोस्टमध्ये टॅग करत त्याने तू, मी आपल्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरु होणार असल्याचंही म्हटलं होतं. पुनीतच्या लग्नाला कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया दोघांनी हजेरी लावली होती. लग्नात दोघांनीही जोरदार डान्स केला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुनीत पाठक याने या ऑगस्ट महिन्यात आपली गर्लफ्रेंड निधी सिंह हिच्याशी साखरपुडा केला होता.त्यानंतर काल अखेर ते लग्नबंधनात अडकले.