कोल्हापुरच्या वीर सुपुत्राने गमावले प्राण
ड्युटीवर तैनात असताना झाले निधन
11 Dece :- सीमारेषेवर दहतवाद्यांशी सामना करत असताना ऐन दिवाळीच्या सणात कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण आल्याची घटना ताजी असताना आज आणखी एका सुपुत्राला कोल्हापूरकरांनी गमावलं आहे. कर्तव्य बजावत असताना चरण तालुक्यातील जवानाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चरण तालुका( शाहूवाडी) येथील राहणारे अमित भगवान साळोखे (वय 30) यांचं बालाघाट मध्य प्रदेश येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी निधन झाले.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
भगवान साळोखे हे ड्युटीवर तैनात असताना संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भगवान साळोखे हे 123 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस( C.R.P.F) मध्ये बालाघाट मध्य प्रदेश येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. ते 2009 ला केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे घरी व गावात समजताच या परिसरात शोककळा पसरली. अमित यांचे दहावीपर्यंत शिक्षण हे रामगिरी विद्यालय चरण येते तर अकरावी बारावी शिक्षण सरूड कॉलेज येथे झाले होते. त्यांचे पश्चात आई वडील, पत्नी, 2 वर्षाची मुलगी, बहीण ,चार चुलते असा मोठा परिवार आहे.