क्रीडा

इंग्लंडचा भारत क्रिकेट दौरा जाहीर; वेळापत्रक आले समोर!

पुढच्या वर्षी फेब्रुवारीत इंग्लंडचा क्रिकेट संघ भारतीय दौऱ्यावर

10 Dece :- पुढच्या वर्षी फेब्रुवारीत इंग्लंडचा क्रिकेट संघ भारतीय दौऱ्यावर येत आहे. या दोन संघादरम्यान चार कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी20 सामने खेळवण्यात येतील. कसोटी सामन्यांची मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरु होतेय. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर 24 फेब्रुवारीपासून तिसऱ्या डे-नाइट कसोटीचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या कारणामुळे मार्च 2020 नंतर भारतात कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. या वर्षी आयपीएलचे सामन्यांचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं होतं.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान होणाऱ्या चार कसोटी सामन्यांचं आयोजन चेन्नई आणि अहमदाबाद येथे करण्यात येणार आहे. सर्व पाचही टी20 सामने अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पुणे येथे खेळवण्यात येईल. पुढच्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ त्यावेळी पाच कसोटी सामने खेळणार आहे. काहीच आठवड्यापूर्वी आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमात बदल केला आहे. भारतीय संघाला याचा फटका बसला असून तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

इंग्लंड-भारत क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक:
कसोटी मालिका
पहिला सामना 5-9 फेब्रुवारी 2021 (चेन्नई)
दुसरा सामना 13-17 फेब्रुवारी 2021 (चेन्नई)
तिसरा सामना (डे-नाइट) 24-28 फेब्रुवारी 2021 (चेन्नई)
चौथा सामना 4-8 मार्च 2021 (अहमदाबाद)

टी20 मालिका
पहिला टी20 सामना- 12 मार्च 2021 (अहमदाबाद)
दुसरा टी20 सामना-14 मार्च 2021 (अहमदाबाद)
तिसरा टी20 सामना- 16 मार्च 2021 (अहमदाबाद)
चौथा टी20 सामना- 18 मार्च 2021 (अहमदाबाद)
पाचवा टी20 सामना- 20 मार्च 2021 (अहमदाबाद)

एकदिवसीय मालिका
पहिला सामना- 23 मार्च 2021 (पुणे)
दुसरा सामना- 26 मार्च 2021 (पुणे)
तिसरा सामना- 28 मार्च 2021 (पुणे)