संजय राऊतांना डॉक्टरांनी दिला कमी बोलण्याचा सल्ला
अँजिओप्लास्टीनंतर संजय राऊतांना रुग्णालयातून डिस्चार्ज
10 Dece :- अँजिओप्लास्टीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ‘पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा व कमी बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. त्यावेळी ते बोलत होते.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
‘मीडियाशी बोल नका, असं डॉक्टरांनी सांगितलंय. काही तणाव आहेत, बेफिकरीपणाने राहतो. यापुढं सर्वच पथ्यपाणी नीट पाळणार आहे. पुन्हा रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये असा प्रयत्न करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘मागील वेळी शस्रक्रिया झाली होती, पण काही गोष्टी राहिल्या होत्या. कोव्हिडमुळे उपचार होऊ शकले नाहीत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं हे सर्व करून घ्यायला सांगितलं,’ असं त्यांनी सांगितलं. ‘खाण्यापिण्यासोबत काही राजकीय पथ्यही डॉक्टरांनी पाळायला सांगितली आहेत. पुढचे काही दिवस कमी बोला. फार कामाचा ताण घेऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सोमवारपासून ‘सामना’त कार्यालयात रुजू होईन, असं ते म्हणाले.