पुढची तारीख कोणत्या कारणासाठी मागीतली- संभाजीराजे
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला केला सवाल
9 Dece :- मराठा आरक्षण प्रश्र्नी सुप्रीम कोर्टात सरकरी वकिलांनी बाजू चांगल्या पध्दतीने मांडली. पण किती दिवस समाजाने आरक्षणाची वाट बघत बसायचे, वकिलांनी पुढची तारीख कोणत्या कारणासाठी मागीतली याच स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रश्नावर झालेल्या सुनावणी दरम्यान आरक्षणावर स्थगिती कायम ठेवण्यात आली. तसेच २५ जानेवारी २०२१ तारखेला अंतिम सुनावणी होईल असेही सांगितले.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
यानंतर आपले मत व्यक्त करताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला सवाल केला आहे की सरकरी वकिलांनी बाजू चांगल्या पध्दतीने मांडली. तरीही पुन्हा पुढची तारीख का? याचे स्पष्टिकरण सरकारने द्यावे. मला एकदाच सरकारला हे सांगायचे आहे.
जो काही तुम्हाला कंम्पाईल रिपोर्ट द्यायचा तो द्या, होमवर्क करुन द्या पण निकाल एकदा लागू दे. हो किंवा नाही… किती दिवस आम्ही वाट बघायची. किती दिवस मराठा समाज आशेवर राहणार. मिळत असेल तर ठीक नाहीतर नाही. टेक्निकल टिम बसवा आणि मराठा समाजाला योग्य निर्णय द्या असेही ते म्हणाले.