सिनेमा,मनोरंजन

अभिनेत्री कृती सेनन कोरोनाच्या घेऱ्यात

एका सेकंदासाठीही मास्क काढू नका- कृती

9 Dece आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’च्या शुटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली होती. आता या सर्वांपाठोपाठ अभिनेत्री कृती सेननलाही कोरोनाची लागण झाली आहे. ती काही दिवसांपूर्वीच चंदिगढवरुन परतली होती.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

चंदिगढमध्ये ती आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकणात बीझी होती. या चित्रपटात कृती सेनन अभिनेता राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं की, तिच्या चित्रपटाच्या शूटिंगचं रॅपअप झालं आहे आणि ती घरी परतली आहे.

दरम्यान, कृती सेननने मुंबईत फोटोग्राफर्सशी बोलताना सांगितलं की, एका सेकंदासाठीही मास्क काढू नका.