‘दिलीप कुमार’ यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा- सायरा बानो
सायरा बनोंनी केले दिलीप कुमार यांच्या तब्येतीबाबत मोठं वक्तव्य
8 Dece :- हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार, लेजेंट जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या वयाची 97 वर्ष पूर्ण झाली आहेत. पत्नी सायरा बानो या दिलीप कुमारची हवी टी पूर्ण काळजी घेत असल्याने दिलीप कुमार 97 वर्षाचे असताना देखील व्यवस्थित असल्याच्या बातम्या अनेकदा सर्वांनी वाचल्या आहेत. मात्र सध्या दिलीप कुमार यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत असल्याने दिलीप कुमार यांच्या कुटूंबात चिंतेची वातावरण निर्माण झाले आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
हिंदी चित्रपट सृष्टीमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे, दिलीप कुमार आणि सायरा बानो. दिलीप कुमार यांच्यासोबत सायरा बानो नेहमी असतात. अशातच सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या तब्येतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सायरा बानो यांनी सांगितलं आहे की, “दिलीप कुमार थकले आहेत. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी झाली आहे.” एवढंच नाहीतर सायरा बानो यांनी सर्वांना दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे.
सायरा बानो म्हणाल्या की, त्या दिलीप कुमार यांची काळजी कोणत्याही दबावापोटी घेत नाहीत, तर त्यांचं दिलीप कुमार यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्या त्यांची खूप काळजी घेतात. त्या पुढे बोलताना हेदेखील म्हणाल्या की, “लोकांनी माझं कौतुक करावं, यासाठी त्यांची काळजी घेत नाही. तर त्यांच्या सहवासात राहणं हे माझ्यासाठी सर्वात प्रिय गोष्ट आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि ते माझा श्वास आहेत. दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. परंतु, यंदाच्या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांचं निधन झाल्यामुळे त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला नाही.