‘या’ बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द
तीनशे कोटी रुपयाच्या वरती भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले
8 Dece :- नियमबाह्य कर्ज थकबाकी आणि भ्रष्टाचार अशा अनेक आरोपानंतर निर्बंध लागलेल्या कराड जनता बँकेचा परवाना अखेर रद्द करण्यात आला आहे. रिझर्व बँकेकडून परवाना रद्द केल्याचे आदेश देण्यात आले आहे. कराड जनता बँकेत तीनशे कोटी रुपयाच्या वरती भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
बँकेचे चेअरमन राजेश पाटील वाठारकर यांच्यासह अनेकांवर झाले होते गुन्हे दाखल करण्यात आले होते. सभासद आर जी पाटील यांनी या संदर्भात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. बॅंकेत पाच लाखाआतील ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. त्याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
या बँकेच्या सातारा, कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणे अशा 29 शाखा आहे. बँकेचे किमान 32 हजार सभासद असून परवाना रद्दच्या वृत्तानंतर सभासदांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बँकेचे संचालक राजेश पाटील-वाठारकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहे.