आदर पुनावालांची ‘एशियन ऑफ द इयर’ सन्मानासाठी निवड
आदर पुनावालासह 6 जणांना सन्मानासाठी निवडलं
5 Dece :- जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था ठरत असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO आदर पुनावाला यांची ‘Asian Of the Year’ म्हणून निवड झाली आहे. सिंगापूरचं दैनिक ‘द स्ट्रेट्स टाईम्स’ने आदर पुनावाला यांच्यासह सहा जणांना ‘एशियन ऑफ द इयर’ सन्मानासाठी निवडलं. यावर्षी कोरोना साथीविरुद्ध लढ्यात योगदान देणाऱ्यांची निवड या सन्मानासाठी केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडन कंपनी अॅस्ट्राझेन्कासोबत कोविड -19 ची लस निर्माण करण्याचं काम करीत आहेत.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
सध्या भारतात या लशींच्या चाचण्या सुरू आहेत. या यादीत आदर पुनावालांव्यतिरिक्त इतर पाच जण आहेत. यामध्ये चिनी संशोधक झांग योंगझेन आहेत, ज्यांनी कोरोना साथीशी संबंधित असणाऱ्या सार्स-सीओव्ही -2 या विषाणूचे जीनोम शोधणाऱ्या टीमचं नेतृत्व केलं होतं. त्याचबरोबर चीनचे मेजर जनरल चेन वई, जपानचे डॉ. युईची, मोरिशिता आणि सिंगापूरचे प्राध्यापक आई इंग आंग या सर्वांनी विषाणूंविरुद्ध लस बनवण्यासाठी बहुमोल कामगिरी केली आहे.
या यादीत दक्षिण कोरीयाचे व्यावसायिक सिओ जंग-जिन यांचंही नाव आहे. त्यांची कंपनी लशीच्या निर्मितीत आणि लस उपलब्ध करुन देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. स्ट्रेट्स टाईम्सच्या वृत्तानुसार, या सर्व लोकांना ‘दी व्हायरस बस्टर्स’ हे विशेषण देण्यात आलं आहे. जे स्वतःच्या क्षमतेनुसार कोरोना विषाणूचा महामारीला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.आदर पूनावाला यांचे वडील सायरस पुनावाला यांनी 1966 साली SII ची स्थापना केली होती. 39 वर्षीय आदर पूनावाला यांनी 2011 मध्ये संस्थेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. पुनावाला म्हणाले की, त्यांची संस्था जगभरातील गरीब देशांपर्यंत लस पोहचवण्यासाठी मदत करीत आहे.