बीड

शिवसेनेची ऑफर! रक्तदान करा अन् मोफत मिळवा एक 1 किलो चिकन

शिवसेनेची रक्तदात्यांसाठी मोठी ऑफर!

5 Dece :- राज्यात कोरोनाच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला स्वयंस्फूर्तीनं पुढे येऊन रक्तदान करावं, असं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात चक्क रक्तदानासाठी प्रलोभन दाखवलं जात आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

प्रत्येक रक्तदात्यास एक किलो चिकन मोफत देण्यात येईल तर शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्यात येईल, अशी ऑफर नगरसेवक आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य समाधान सदा सरवणकर यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ माहिम-वरळी विधानसभा क्षेत्रातील राजाभाऊ साळवी मैदान, न्यू प्रभादेवी रोड, मुंबई येथे येत्या 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. नगरदेवक समाधान सदा सरवणकर हे या रक्तदान शिबीराचे आयोजक आहेत.

कोविडच्या या संकटात रक्तदान करू लोकांचे प्राण वाचवू या मथळ्याखाली एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘फ्री चिकन ब्लड डोनर’ असं म्हणत प्रत्येक रक्तदात्यास 1 किलो चिकन देण्यात येईल (शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्यात येईल.) अशी ऑफर देण्यात आली आहे. या रक्तदान शिबीरासाठी पूर्व नोंदणी 11 डिसेंबरपूर्वी शिवसेना शाखा 194, सामना प्रेस शेजारी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.