बीड कोरोना- आज 28 रुग्ण पॉझिटिव्ह तर 48 रुग्ण कोरोनामुक्त
कोरोना गाडीचा वेग मंदावला
5 Dece :- बीड जिल्ह्यात भरधाव वेगाने धावणाऱ्या कोरोना गाडीचा वेग चांगलाच मंदावला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील बीडकरांना दिलासा देणारे आहे. कोरोना रुग्णवाढ जरी समाधानकारक घटत असली तरी नागरिकांनी खबदारीने वागणे आत्यावश्यक आहे. मात्र नागरिक तोंडावर मास्क न लावता आणि सोशल डिस्टन्स न बाळगता सर्वत्र वावरताना दिसत आहेत.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
कोरोना विषाणूचा पसरावं आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेप्रमाणे प्रत्येकाने दक्षता घेतल्यास कोरोनाशी लढा देणे सोपे होईल.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (शनिवारी) बीड जिल्ह्यात केवळ 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट घटत असून रिकव्हरी रेट वाढत आहे. तर मृत्युदर सुद्धा कमी होताना दिसत आहे.