News

Transaction फेल होऊनही खात्यातून पैसे गेल्यास करा हे काम, बँक दररोज देईल नुकसान भरपाई

नवी दिल्ली, 05 डिसेंबर: बँक खात्यातून पैसे कापले गेले, मात्र Transaction फेल झालं तर पैसे त्वरित खात्यामध्ये येणं अपेक्षित असतं. पण अनेकदा असं होतं की खात्यामध्ये पैसे यायला काही वेळ जातो. ग्राहकांना आपले पैसे मिळवण्यासाठी तक्रार करण्याची देखील आवश्यकता भासते. तुमच्याबरोबर जर असं घडलं असेल तर बँकेचे नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. जर तक्रार केल्यानंतर सात दिवसांच्या आतमध्ये ग्राहकांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर कार्ड जारी करणाऱ्या बँकांना रोज 100 रुपयाच्या हिशोबाने भरपाई द्यावी लागू शकते. फेल ट्रान्झॅक्शनच्या प्रकरणात आरबीआय (RBI) चे नियम 20 सप्टेंबर 2019 पासून लागू झाले आहेत.

UPI ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर अशाप्रकारे करा तक्रार

जर तुमचे डिजिटल ट्रान्झॅक्शन केल्यानंतर पैसे परत आले नाहीत तर तुम्ही UPI App वर जाऊन तक्रार करू शकता. याकरता तुम्हाला ‘पेमेंट हिस्ट्री’ पर्यायावर जावं लागेल. याठिराणी रेज डिस्प्यूटवर जाऊन तुमती तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार योग्य असल्यास बँक पैसे परत करेल.

30 दिवसांच्या आतमध्ये करा तक्रार

नियमानुसार बँकेच्या एटीएम बॉक्सवर संबंधित ऑफिसरचे नाव आणि टेलीफोन नंबर/टोल फ्री नंबर/हेल्थ डेस्क नंबर डिस्प्ले करणे गरजेचे आहे.  ट्रान्झॅक्शन फेल होऊनही पैसे कापले गेल्यास 7 दिवसांच्या आतमध्ये पैसे क्रेडिट होणे अपेक्षित असते. तक्रार दाखल केल्यानंतर 7 दिवस मोजले जातात. सात दिवसांच्या आतमध्ये पैसे ग्राहकांच्या खात्यामध्ये क्रेडिट नाही झाले तर बँकेला या विलंबासाठी रोज 100 रुपये भरपाई द्यावी लागेल. ही रक्कम त्यांना कोणत्याही अटीशिवाय ग्राहकांच्या खात्यामध्ये टाकावी लागेल. ग्राहकांना तेव्हाच ही रक्कम मिळेल, जर व्यवहार फेल झाल्याची तक्रार 30 दिवसांच्या आत केली. ट्रान्झॅक्शनची पावती  किंवा खात्याचे स्टेटमेंट देत तुम्हाला ही तक्रार करावी लागेल. जर 7 दिवसांच्या आतमध्ये तुमचे पैसे परत आले नाहीत, तर तुम्हाला अॅनेक्शर 5 फॉर्म भरावा लागेल. ज्यादिवशी तुम्ही फॉर्म भराल त्यादिवशी तुमची पेनल्टी सुरू होईल.

मनीकंट्रोलच्या वृत्तीनुसार हा नियम बँकांव्यतिरिक्त एनबीएफसी साठीदेखील लागू होतो. हा नियम कम्यूनिकेशन लिंक फेल झाल्यानंतर, एटीएममध्ये कॅश नसल्यास, टाइम आउट सेशन झाल्यास देखील लागू होतो. अन्य बँकांच्या एटीएममध्ये ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास देखील हा नियम लागू होतो. तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएममध्ये किंवा दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये कार्डचा वापर केला, आणि खात्यातून पैसे कापले गेले पण तुमच्या हातात पैसे आले नाही तर कार्ड जारी करणाऱ्या बँकेत तक्रार द्या.

वेळेत या तक्रारीचे निरसन न झाल्यास ग्राहक 30 दिवसांच्या आतमध्ये बँकिंग ओम्बड्समेनकडे तक्रार करू शकता. बँक उत्तर देत नसेल किंवा बँकेच्या उत्तरामुळे तुम्ही समाधानी नसाल तर बँकिंग ओम्बड्समेनकडे तक्रार करता येईल.