बीड

बिबट्याचा धुमाकूळ; फुंदेवाडीच्या शेतकऱ्याची केली शिकार

ज्वारीला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह व शीर सापडले

4 Dece :- कोरोनाच्या कहरानंतर बिबट्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात बिबट्याची प्रचंड दहशद निर्माण झाली असून गावकऱ्यांना गावात वावरणे आणि शेतात काम करणे अशक्य झाले आहे. रोज बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या बातम्यांनी गावकरी जाम वैतागले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी(लिंबेवाडी) येथे ज्वारीला पाणी देत असलेल्या कल्याण दासा फुंदे वय 45 यांना पकडून ओढत नेले. रात्र झाली तरी कल्याण शेतातून घरी परत येत नसल्याने घरच्या मंडळींनी शोध घेतला असता शेतात कल्याण यांच्या चपला, चष्मा, रक्त सांडलेले ठिकाणी पाहून सर्वानाच हादरा बसला. मग पोलिसांनी गावक-यांच्या मदतीने शोध घेतला असता कल्याणचे मुंडके नसलेला मृतदेह शेतात झुडपात आढळून आला.

रात्री उशीरा कल्याणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे. बिबटयाच्या दहशतीमुळे संपुर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. रात्रीची लाईट आणि शेतात पिकांना पाणी देणे हे काम आता बिबट्याच्या दहशतीने जीवघेणे झाले आहे. करमाळा तालुक्यात सर्वत्रच बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.