..अन्यथा अडचणी वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा
नवी दिल्ली, 4 डिसेंबर : 1 डिसेंबरपासून वाहनांवर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट (High Security Number Plate) नसल्यास आरटीओमध्ये (RTO) गाडीसंबंधी जवळपास सर्वच कामं रखडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये (Commercial Vehicles)हाय सिक्योरिटी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने 1 एप्रिल 2019 आधी खरेदी केलेल्या वाहनांमध्ये हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला होता.
HSRP एक होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाचं इंजिन आणि Chassis नंबर असतो. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट वाहनाची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता तयार करण्यात आली आहे. हा नंबर प्रेशर मशिनने लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पीन असते, जी वाहनाशी जोडली जाते. ही पीन एकदा वाहन आणि प्लेटशी जोडली गेल्यास, दोन्ही बाजूने लॉक होते.
व्यावसायिक वाहनांसाठी अडचणी वाढू शकतात –
हाय सिक्योरिटी नंबर प्लेटशिवाय व्यावसायिक वाहनांना प्रवास करणं कठीण होईल. ट्रक, बस, छोट्या वाहनांसाठी परमिट, मासिक टॅक्स जमा होणार नाही. नवीन नंबर प्लेटशिवाय जे निर्बंध लागू होतील, त्याचा थेट परिणाम व्यावसायिक वाहनांवर होईल.
RTO मध्ये ही कामं होणार नाही –
– विना HSRP वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सेकेंड कॉपी
– वाहनाच रजिस्ट्रेशन ट्रान्सफर
– ऍड्रेस चेंज
– रजिस्ट्रेशन रिन्यूवेशन
– RTO Hypothecation cancellation
– नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट
– Hypothecation endorsement
– महिन्याचा टॅक्स
– नवीन परमिट
– तात्पुरतं परमिट
– स्पेशल परमिट
– नॅशनल परमिट
– EMI वाहनांचं निस्तारण
आतापर्यंत कोणत्यात वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नसल्यास, त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यास बंदी होती. परंतु 15 ऑक्टोबर रोजी परिवहन आयुक्तांनी आदेश जारी करत, विना HSRP वाहनांना RTO मध्ये होणाऱ्या 13 कामांवर बंदी घालण्यात आली होती.
कसा कराल ऑनलाईन अर्ज –
हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टिकर लावण्याची प्रक्रिया आता सहज-सोपी झाली आहे. High Security Registration Plates लावण्यासाठी दोन पोर्टल तयार करण्यात आले आहेत. यासाठी bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खाजगी वाहन यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर काही माहिती भरावी लागेल. गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास, www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागेल.