राजकारण

रजनीकांतची राजकारणात एंट्री; वर्षांखेर करणार घोषणा

विधानसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत

3 Dece :- अभिनेता रजनीकांत Rajinikanth यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा केली आहे. थलैवा म्हणजेच, रजनीकांत निवडणूक लढवणार का? राजकीय जीवनात उतरणार का अशा अनेक प्रश्नांचं उत्तर मिळालं आहे. अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचं पक्कं केलं आहे. ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा 31 डिसेंबरला करणार आहेत. तर जानेवारीत नवीन पक्षाचं लॉन्चिंग केलं जाणार असल्याची माहिती आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

तमिळनाडू Tamil Nadu मधील गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकीय पक्ष निवडणुकांच्या दृष्टीने सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा Tamil Nadu Assembly Election निवडणूकीपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांचं राजकारणातील एन्ट्रीबाबत वक्तव्य समोर आलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून संकेत मिळाले होते की, रजनीकांत विधानसभा निवडणूक लढू शकतात.

2021मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणूकांमध्ये रजनीकांत आणि त्यांच्या संघटनेची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता मिळालेली नाही. रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं होतं की, सर्वात आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.