राजकारण

संजय राऊत ICU मध्ये अंडर ऑब्झरर्व्हेशन!

तब्बल सव्वा तास करण्यात आली शस्त्रक्रिया

3 Dece :- शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत Shiv Sena Leader Sanjay राऊत यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी सर्जरी angioplasty surgery करण्यात आली. तब्बल सव्वा तास ही सर्जरी चालली. सध्या संजय राऊत आयसीयूमध्ये आहेत. त्यांनी तिथे अंडर ऑब्झरर्व्हेशन ठेवण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

हृदयासंबंधी त्रास पुन्हा सुरू झाल्यानंतर काल दुपारी त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये Leelavati Hospital mumbai दाखल करण्यात आलं. हृदयरोगतज्ज्ञ डॉ मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

मात्र, संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांना ताण आणि थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यामध्ये सरकार स्थापनेबाबत गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये बैठक झाली होती. या बैठकीला राऊत हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस असल्याचे निष्पन्न झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर पहिल्यांदा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला होता. हृदयविकाराच्या आजाराचे निदान करण्यासाठी जी चाचणी केली जाते त्याला अँजिओग्राफी म्हणतात. हृदयविकार आहे की नाही हे या चाचणीतून स्पष्ट होतं. त्यानंतर उपचाराची दिशा ठरवली जाते. ही चाचणी सोपी, सुरक्षित आणि पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होणारी आहे.