भारत

HDFC ला मोठा झटका; बँकेच्या डिजिटल सेवांवर RBIकडून निर्बंध

मागील दोन वर्षात बँकेसाठी हा तिसरा मोठा झटका आहे

3 Dece :- भारतीय रिझर्व्ह बँकेने Reserve Bank खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीला HDFC मोठा झटका दिला आहे. आरबीआयने एचडीएफसीच्या सर्व डिजिटल सेवांवर निर्बंध घातले आहेत. आरबीआयने 2 डिसेंबर रोजी आदेश जारी करुन इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि पेमेंट यूटिलिटी सर्व्हिसवर बंदी घातली आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी ग्राहकांना नवे क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही बंदी घातली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

मागील दोन वर्षात एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना डिजिटल सेवांमध्ये अनेक वेळा अडचणी आल्या. त्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. आरबीआयने 2 डिसेंबर रोजी सर्व डिजिटल सेवा थांबवण्याचा आदेश दिला आहे, असं बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. आदेशात आरबीआयने सांगितलं आहे की बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पेमेंट यूटिलिटीजमध्ये सातत्याने अडचणी येत आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुरु आहे.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत 21 नोव्हेंबर रोजी बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये समस्या आली होती. प्रायमरी डेटा सेंटरमध्ये पॉवर फेल झाल्यामुळे ही अडचण आली होती.” बँकेने डिजिटल बिझनेसशी संबंधित सर्व कार्यक्रमांची लॉन्चिंग तात्पुरत्या स्वरुपात रोखावी, असा सल्ला आरबीआयने दिला आहे. एचडीएफसी बँक आपलं डिजिटल 2.0 लॉन्च करण्याच्या तयारीत होती. ज्यामध्ये बरेच डिजिटल चॅनल लॉन्च होणार होते. परंतु आता आरबीआयने सर्व सेवांवर निर्बंध घातल्याने बँकेला मोठा धक्का बसला आहे.

यासोबतच इतर सर्व बिझनेस जनरेटिंग आयटी अॅप्लिकेशनही रोखण्यास सांगितले आहे. यामध्ये नव्या क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या सोर्सिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतरच म्हणजे सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतरच हे निर्बंध हटवले जातील असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.