सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी केले मोठे विधान
राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण
3 Dece :- भाजपचे नेते आशिष शेलारांनी Bjp Leader Ashish Shelar शरद पवार Sharad Pawar यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हायला हवी असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्या मुख्यमंत्रीपदा विषयीच्या चर्चांना सुरुवात झाली. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे Rashtrawadi Congress सर्वेसर्वा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाविषयी मोठे विधान केले आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाविषयाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. पवार म्हणाले की, ‘सुप्रिया सुळेंना राज्यातील राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालेली आहेत. त्यांना देश पातळीवरच काम करण्याचा इंट्रेस्ट आहे. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. त्यांची आवड देश पातळीच्या कामात आहे’ ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचे प्रकाश राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केले होते.
या कार्यक्रमात भाजप नेते आशिष शेलारही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. शेलार म्हणाले होते की, ‘संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचेही सुद्धा समर्थन असू शकते’ त्यांच्या या विधानानंतर राज्यात सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र यानंतर शेलार यांनी ते वक्तव्य राजकीय नसून पुस्तकातील संदर्भाशी निगडीत आहे असे म्हटले होते.