क्रीडा

माहीची निवृत्तीनंतर टोमॅटो विक्री जोमात

माहीच्या 3 एकरांत फक्त टोमॅटोची लागवड

2 Dece :- आपल्या रांगडेपणाच्या क्रिकेटशैलीने जगभरात स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करणारा महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटप्रेमींचा माही क्रिकेटनंतर आता शेतीत आपला हात आजमावत आहे. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या बाजारात धोनीच्या शेतातल्या भाज्या भरपूर विकल्या जात आहेत. या भाज्यांची चर्चा आता रांचीमधून निघून इतर राज्यांतही होत आहे. भाजीपाला बाजारात ज्या भाजीची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे धोनीच्या शेतातील टोमॅटो.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

धोनीने आपल्या 43 एकराच्या फार्म हाऊसमध्ये 3 एकरांत फक्त टोमॅटोची लागवड केली आहे.शेतातल्या झाडांवर टोमॅटो पिकल्यानंतर ते धोनीच्या फार्म हाऊसमधून बाजारात पाठवले जात आहेत. TO 1156 प्रकाराचे हे टोमॅटो बाजारात 40 रुपये प्रति किलोला विकले जात आहे. रांचीच्या सँबो येथे धोनीचे फार्म हाऊस आहे. टोमॅटोबरोबरच इतर भाजीपालाही येथे पिकविला जात आहे. टोमॅटो बाजारात दाखल सुद्धा झाला आहेत.जाणकारांचं म्हणणं आहे की, धोनीच्या फार्म हाऊसमधले टोमॅटो खास असतात. मार्केटमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.

धोनीची अशी इच्छा आहे की त्याच्याबरोबर शेतातील कामांसाठी असलेली संपूर्ण टीमच्या उत्पन्नाचे साधन हे त्याच्या फार्म हाऊसमधून विकल्या जाणाऱ्या भाजीपाला असाव्यात. टोमॅटो सोबतच धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात कोबी आणि मटारची लागवड केली आहे. खरं तर धोनीला मटार खूप आवडतो. धोनीचे अग्रीकल्चर कंसल्टंट रोशन कुमार सांगतात की, धोनी म्हणाला आहे की, जेव्हा तो फार्म हाऊसवर येईन तेव्हा इथले मटार शेतातच तोडून तिथेच बसून स्वतः खाणार आहे. क्रिकेटनंतर धोनीची ‘शेती’ ही नवी इनिंग सुरु झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.