संजय राऊत लीलावती रुग्णालयात होणार दाखल
ताण आणि थकवयाच्या त्रासामुळे त्रस्त
2 Dece :- शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. संजय राऊत यांच्यावर गुरुवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणारे. यापूर्वी 2019 नोव्हेंबरमध्ये राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
गेल्या वर्षी अँजिओप्लास्टी दरम्यान हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. डॉ मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. यापूर्वीही डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांनी राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी केली होती.
शनिवारी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांनी हेल्थ चेकअप केलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर आहे.परंतु त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवतोय. यासाठी राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होऊन उद्या त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणारे.