सिनेमा,मनोरंजन

भारतीला सोनी चॅनल करणार बाय? मात्र कपिल शर्माचा विरोध

भारतीला ‘द कपिल शर्मा शो मधून काढून टाकण्याची मागणी

1 Dece :- भारतातील सुप्रसिद्ध कॉमेडियन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंह Bharti Sing सर्वत्र लोकप्रिय आहे. भारतीच्या घरी काही दिवसांपूर्वी एनसीबीने छापेमारी केली होती. त्यांच्या घरातून ग्रॅमपेक्षा जास्त गांजाही जप्त करण्यात आला होता. भारतीने आपण स्वतः गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB आणि दोघांनाही अटक केली होती.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

दरम्यान अटक आणि त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर भारती सिंहने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने शूटिंगला पुन्हा सुरुवात केल्याचं दिसत होतं. या एवढ्या मोठ्या प्रकरणानंतर सोनी चॅनल भरतीला ‘द कपिल शर्मा शो’ The Kapil Sharma Show या कौटुंबिक कार्यक्रमात ठेवेल का असा प्रश्न समोर पडला आहे.

सोशल मीडियावर भरतीला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. भारती सिंहला ‘द कपिल शर्मा शो मधून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. भरतीच्या प्रकरणामुळे सोनी कॅहाँलची बदनामी होईल,भरतीचे शोमध्ये असण्यामुळे नवे वाद निर्माण होतील. अशी चॅनलची बाजू आहे. पण या निर्णयाला कपिल शर्माचा मात्र विरोध आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण भारती आता किती दिवस शूटिंग करणार? प्रेक्षक तिला कशा पद्धतीने स्वीकारणार? का खरंच भरतीच्या करिअरचा हा शेवट आहे हे सांगणं थोडंसं कठीण आहे.

‘शास्त्रीं’ च्या ‘विराट’ सेनेचा लाजीरवाना पराभव!