सिनेमा,मनोरंजन

‘या’ कारणामुळे जेठालाल भाई संतापले!

हल्लीच्या वेब सिरीजवर व्यक्त केली नाराजी

1 Dece :- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ Tarak Mehata Ka Oolata Chashmah या मालिकेच्या माध्यमातून घराघरांमध्ये लोकप्रिय असलेले जेठालाल भाई प्रत्येकवेळी पोट दुखवेस्तवर हसवतात मात्र यावेळी जेठा भाईंनी वेब सिरीज निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकांवर संतापत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सध्या सर्वत्र वेब सिरीजची प्रचंड प्रमाणात क्रेझ असल्याचे पहिला मिळते. हल्लीची पीडी वेगवेगळ्या अँपच्या माध्यमातून नवनवीन शॉर्ट फिल्म, वेब सिरीज पाहण्यासाठी उत्सुक असते. मात्र या शॉर्ट फिल्म, वेब सिरीजमधील संवाद अतिशय खालच्या थरातील शब्दांमधील असतात. तर अनेक ९०% शॉर्ट फिल्म, वेब सिरीजमधील दृश्य पॉर्न फिल्म असल्यासारखी दिग्दर्शित करण्यात येतात. आणि याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व गोष्टींवर जेठालाल उर्फ दिलीप जोशींनी Dilip Joshi नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा :- 55 रुपयांनी गॅस सिलेंडर महागले; जाणून घ्या नवे दर!

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दिलीप जोशी सातत्याने चर्चेत येत असून आता त्यांनी वेब सीरिजमधील बोल्ड आणि अर्वाच्च भाषेतील संवादावर संताप व्यक्त केला आहे. सौरभ पंत यांच्या युट्यूब पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.

वाचा :- राजकीय नेते नाही, ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार पहिल्यांदा कोरोना लस

वाचा :- ‘शास्त्रीं’ च्या ‘विराट’ सेनेचा लाजीरवाना पराभव!