राजकारण

मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे, शिवसैनिक म्हणूनच काम करेन

उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

1 Dece :- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशानंतर उर्मिला पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांच्या उत्तरे दिली. शिवसेना प्रवेशासाठी कुठलाही दबाव नाही असे उर्मिला यांनी यावेळी सांगितले. तसेच उर्मिलाने शिवसेनेच्या महिला आघाडीचे आणि महाविकास आघाडी सरकारच्या कामाचे कौतुक केले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

शिवसेनेची महिला आघाडी भक्कम असल्याचे त्या म्हणाल्या. मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे, शिवसैनिक म्हणूनच काम करेन, राज्यपालांकडे माझे नाव पाठवले आहे, माझ्यावर पक्षप्रवेशाची कोणतीही सक्ती नव्हती, मुळात मला काम करण्याची इच्छा होती, त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेशावर मला ट्रोलिंग करणाऱ्यांचे स्वागत करते, पण मराठी मुलगी असल्याचे ट्रोलिंगला घाबरून पाऊल मागे घेणार नाही, असे उर्मिला म्हणाल्या.

वाचा :- मुलींच्या हॉस्टेलमध्ये शिरला बिबट्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोना संकट काळात खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले. ते सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. आपुलकीने सर्वांशी बोलत आहेत. घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सर्वांना समजावतात. उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामामुळे मी प्रभावित झाले. अशा नेतृत्वासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिली. शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे. मला महिला आघाडीचा भाग होण्यास मिळाले तर आनंदच होईल. मला महिला सुरक्षा आणि तत्सम विषयांवर काम करायला आवडेल असे उर्मिला यांनी सांगितले.

वाचा :- पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली, आयसोलेट होण्याचा घेतला निर्णय

मी जन्माने आणि कर्माने हिंदू : सेक्युलरचा अर्थ इतर धर्मांचा तिरस्कार करणे नाही, मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. जसा देव मंदिराच्या गाभाऱ्यात असतो, तसा धर्म हा मनातील आस्थेचा विषय आहे. माझा हिंदू धर्माचा अभ्यास आहे. मी वयाच्या नवव्या वर्षापासून योग करत. त्यामुळे मला हिंदू धर्माविषयी पुरेशी जाण असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केले.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविषयी आदर आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात हे उत्तम नेते आहेत. काँग्रेसविषयी माझ्या मनात कोणताही वाईट हेतू नाही. काँग्रेस सोडण्यामागे इतर कारण होते. काँग्रेस सोडताना राजकारण सोडेन असे म्हणाले नव्हते. मी फक्त पक्ष सोडत आहे, पण लोकांसाठी काम करतच राहणार असे म्हणाले होते.

वाचा :- उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा ‘मातोश्री’वर पायी मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

कंगनाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर उर्मिला म्हणाल्या की, राज्यात महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या एका वर्षांत सरकारने कुणालाही त्रास दिला नाही आणि यापुढेही देणार नाही याची मला खात्री आहे. मुंबईत महिला सुरक्षित असून मला या मुंबईचा अभिमान आहे. उद्धव ठाकरे यांनी फोन केला. ते घरातील सदस्याप्रमाणे बोलतात. विधानपरिषदेचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा समृद्ध आहे, तो वारसा वाढवण्यासाठी आपण यावे, हा उद्धव ठाकरेंचा विचार आवडला असेही त्या म्हणाल्या.

वाचा :- उदयनराजेंनी ठाकरे सरकारबद्दल पुन्हा वर्तवलं भाकीत, म्हणाले…