पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली, आयसोलेट होण्याचा घेतला निर्णय
मुंबई, 01 डिसेंबर : भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे पंकजा यांनी कोरोनाची (Corona) परिस्थिती पाहता आयोसेलट (isolate) होण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, पंकजा यांनी पदवीधर निवडणुकीच्या teacher and graduate constituency election 2020) मतदानासाठी औरंगाबादच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आहे. ‘सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून isolate झाले आहे’ असं पंकजा यांनी सांगितले आहे. कोरोनाची (Corona) परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांनी खबरदारी म्हणून आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे.