क्रीडा

‘शास्त्रीं’ च्या ‘विराट’ सेनेचा लाजीरवाना पराभव!

कुठलही नियोजन नसलेला गचाळ नेतृत्व करणारा कर्णधार विराट कोहली

30 Nov :- मोठ्यात मोठ्या विक्रमांना गवसनी घालनारी शास्त्रींची विराट ऑस्ट्रेलिअन संघापुढे नतमस्तक झाली. विरोधी संघाला पराभूत करण्यासाठी कुठलही नियोजन नसलेला गचाळ नेतृत्व करणारा कर्णधार विराट कोहली केवळ भारताचा पराभव का झाला हे सामन्याअंती चांगल्या पद्धतीने सांगु शकतो. बीसीसीआईला विराटमध्ये सक्षम कर्णधार म्हणून नेतृत्वासाठी अशी कुठली गुण दिसतात अकालनिय आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

मागील अनेक महिन्यांपासुन विराट कोहलीला फलंदाजीचा सुर गवसत नाही. दुसऱ्या सामन्यात विराटने काही प्रमाणात तालबद्ध फलंदाजी केली मात्र अव्हानाच पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा विराट यावेळी संघाला विजय मिळवून देण्यात असमर्थ ठरला. आयपीएलमध्ये एकहाती विजयाश्री खेचुन आनण्याची ताकद ठेवनारी खेळाडू ऑस्ट्रेलिया संघापुढे घुड़घे टेकताना दिसली.

एक नाहीतर तर सलग दुसऱ्या सामन्याही भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. सीरीज सुरु होण्यापुर्वी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री म्हणाले होते की, आमच्यकडे टॉप लेवलची सुपर गोलंदाज आहेत जे भारताच्या विजयाचे कारण बनतील. असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला होता . विजयाचे माहित नाही पण शास्त्रींचा ओव्हर कॉन्फिडेंस परभावाचे कारण बनला हे नक्की.

पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज वार्नर, फिंच, स्मिथ, मैक्सवेल यांना थोपवण्यासाठी भारतीय कर्णधार आणि गोलंदाजांकडे कुठेच उत्तर शिल्लक नसल्याचे निदर्शनास येत होते. तर दुसऱ्या सामन्यात सुद्धा अव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंजांची अवस्था बिकट झाल्याची दिसून आली. ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघासोबत दोन हात करण्यासाठी रोहित शर्मा सारखा प्रतिभावंत खेळाडूचा संघात समावेश नसने ही बाब सुद्धा समजण्या पलीकडे आहे. शास्त्रींनी आणि विराटने कुठेतरी भारतीय संघात आणि स्वतः मध्ये बदल करने गरजेचे आहे. अन्यथा भारताला आशा अनेक लाजीवाण्या परभावाला समोर जावे लागेल.