सिनेमा,मनोरंजन

देसी गर्ल हॉलीवूडपटात झळकणार

चित्रपटाचा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला

30 Nov :- सौंदर्य आणि दमदार अभिनय शैलीने जगभरात लोकप्रिय असणारी आघाडीचीअभिनेत्री प्रियंका चोप्रा उर्फ देसी गर्ल कायम आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. सध्या देसी गर्ल पती निक बरोबर वैवाहिक आयुष्य इंजॉय करताना अनेकदा दिसते. निकसह देसी गर्लचे सोशल मीडियावर अनेक वीडियोस वायरल झाले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पती निक बरोबर डान्स करताना तर कधी धींगाना घालताना तर कधी पार्टिमध्ये रोमॅन्स करताना वैवाहिक आयुष्याचा मनमुराद आनंद लुटताना देसी गर्ल दिसते आहे. सध्या देसी गर्ल आगामी चित्रपटामुळे चर्चेत असून ती लवकरच वी कॅन बी हिरोज या हॉलीवूडपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

वाचा :- मुलींच्या हॉस्टेलमध्ये शिरला बिबट्या

प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वी कॅन बी हिरोज या चित्रपटाची माहिती दिली असून सोबत टीझर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या टीझरमधून प्रियांका पहिल्यांदाच एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमधून सुपरहीरो आणि एलियन यांच्यातील युद्ध दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सगळे सुपरहीरो लहान मुले आहेत. बॉलीवुडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारी देसी गर्ल हॉलीवुडपटात किती यशस्वी ठरते हे पाहने विशेष ठरणार आहे.

वाचा :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या