भारत

मुलींच्या हॉस्टेलमध्ये शिरला बिबट्या

गुवाहाटीत बिबट्याचा थरार!

30 Nov :- बिबट्याचा थरार सर्वत्र पहिला मिळत. एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे बिबट्याची दहशदीने नागरिकांचा जीव वेठीस धरला आहे. आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीत सोमवारी थरार पाहायला मिळला. हा थरार होता बिबट्याचा जंगली प्राण्यांचं मानवी वस्तीत येणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

गेल्या काही दिवसांपासून प्राणी आणि माणसांमधला हा संघर्ष जास्तच तीव्र झाला आहे. त्याच संघर्षाचं आणखी एक उदाहरण गुवाहाटीत बघायला मिळालं. इथल्या एका मुलींच्या हॉस्टेलमध्येच चक्क बिबट्या घुसला आणि काही तास त्याने ठाम मांडलं. त्यामुळे हॉस्टेलमधल्या मुलींची एकच धावपळ उडाली. नंतर वनखात्याने या बिबट्याला 4 तासांच्या प्रयत्नानंतर पकडण्यात यश मिळवलं आणि पुन्हा त्याची जंगलात रवानगी केली.

वाचा :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

हंगेराबारी इथं असलेल्या माईलस्टोन या मुलींच्या हॉस्टेलमध्ये ही घटना घडली आहे. पहाटे हा बिबट्या कंपाउंड वॉल ओलांडत हॉस्टेलमध्ये घुसला आणि ग्रीलमध्ये असलेल्या सोफ्याच्या खाली जाऊन बसला. हॉस्टेलचे मालक जेव्हा पहाटे उठले तेव्हा त्यांना हा पाहुणा आलेला त्यांना दिसला. त्यानंतर त्या मालकांनी हॉस्टेमधल्या रुम्समध्ये असलेल्या काही मुलींना सूचना देत दार न उघडण्याची सूचना केली आणि खिडक्यांच्या काचाही लावण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची वन खात्याला त्याची माहिती दिली.

वाचा :- बीएचआर घोटाळ्याचे धागेदोरे गिरीश महाजनांपर्यंत?

काही वेळातच वनखात्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं. बिबट्या हा सोफ्याखाली अडचणीत बसला आणि तिथेच अडकल्याने त्याला हुसकावून लावणेही अवघड होते. मात्र वनखात्याच्या तज्ज्ञ मंडळींनी त्याला तिथून 4 तासांच्या थरारक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात बंद करण्यात यश मिळवलं.

वाचा :- मग कोरोना लशीचे बारामतीच्या लॅबमधून वितरण करणार का? चंद्रकांत पाटलांचा टोला