महाराष्ट्र

राज्यात पुन्हा लॉकडाऊन!

कोरोनाच्या संसर्गामुळे घेतला निर्णय

27 Nov :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारकडून शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. कोरोनाच्या Corona जीवघेण्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन Lockdown वाढवण्यात आला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. maharashtra lockdown दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचं समोर आलं. खरंतर, मिशन बिगिनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.

वाचा :- शरद पवार रुग्णालयात दाखल; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची प्रकृती चिंताजनक

खरंतर, देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून MHA बुधवारी देण्यात आली होती. केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना Covid Guidelines जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले.

वाचा :- ‘या’ बंडखोर नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे:
सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
सामाजिक अंतर राखणं गरजेचं
सतत हात धुणे आवश्यक
चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी
धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी
बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी

वाचा :- आष्टी तालुक्यात बिबट्याने मुलास पळवले

वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! वेश्याव्यवसायातील महिलांना मिळणार 5 हजार रुपये महिना