निरोधाच्या जाहिराती पॉर्न फिल्मसारख्या- मद्रास उच्च न्यायालय
प्रसारणविरोधात आदेश जारी
27 Nov :- सेक्शुअल जाहिरातींच्या प्रसारणविरोधात मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने एक आदेश जारी केला आहे. त्यामध्ये अश्लिलता असल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. कंडोमसारख्या वस्तूंच्या जाहिरातींचा यामध्ये समावेश होतो याचिकाकर्ते केएस सागादेवारा यांनी सेक्शुअल जाहिराती च्या प्रसारणावरबंदी घालण्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली होती.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
कंडोम इनर वेअर्स विकण्याच्या नावावर चालवण्यात येणाऱ्या जाहिराती या केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम १९९४ च्या नियम ७(१) उल्लंघन करत होत्या. काही चॅनेल्स दिवसभर असे कार्यक्रम प्रसारित करत होते. तसेच कंडोमच्या काही जाहिराती या जवळपास पॉर्न फिल्म सारखे असतात त्याचा तरुण प्रेक्षकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो असं न्यायालयाने म्हटले आहे.न्यायाधीश एन किरूबाकरन आणि बी पुगालेंधी यांच्या पीठाने दिलेल्या आदेशानुसार मुलं महिलांच्या हिताच्या संरक्षणाचा हवाला दिला आहे तसेच टीव्हीवर वर दाखवण्यात येणाऱ्या अशा जाहिरातींवर हरकत घेतली आहे.
वाचा :- शरद पवार रुग्णालयात दाखल; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची प्रकृती चिंताजनक
आदेशानुसार, धक्कादायक अशी गोष्ट आहे की रात्री दहा वाजता जवळपास प्रत्येक टीव्ही चॅनेलवर अशा काही जाहिराती सुरू असतात. ज्यामध्ये कंडोम जाहिरातीचा समावेश सर्वाधिक असतो. त्या जाहिरातीतून तेच प्रदर्शन होत असतं. या जाहिराती सर्व वयाच्या लोकांकडून पाहिल्या जातात आणि टिव्ही चैनल वर चालवल्या जातात या जाहिरातींमध्ये अश्लीलता पाहून कोणालाही धक्का बसेल.
वाचा :- पंकजाताईंची ठाकरे सरकारवर जोरदार टीका
केबल टेलिव्हिजन नेटवर्क अधिनियम १९९५ नुसार कलम १६ अंतर्गत जाहिरातींमध्ये दाखवली जाणारी ही नग्नता गुन्हा आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क अधिनियम आणि नियमांचा अंतर्गत प्रोग्रॅम कोड आणि जाहिराती खुर्च्या उल्लंघनावर देखरेख केली जाते; मात्र कोड अंतर्गत जाहिरातींवर सेन्सॉरशिप करू शकत नाही. एका आरटीआयअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तरांमधून अशी माहिती समोर आली आहे.