राजकारण

शरद पवार रुग्णालयात दाखल; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची प्रकृती चिंताजनक

रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची जमली प्रचंड गर्दी

27 Nov :- राष्ट्रवादीचे NCP आमदार भारत भालके Bharat Bhalke यांना उपचारांसाठी रुबी हॉल Ruby Hall Clinic क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar, पालकमंत्री दत्तात्रय भरणे Dattatray Bharne यांनी रुबी हॉलमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांनी आमदार भालके यांच्या डॉक्टरांकडून प्रकृतीबद्दलची माहिती घेतली. याच दरम्यान रूपालीताई चाकणकर Rupali Chakankar यांच्यासह आदी अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांची विचारपूस केली.

वाचा :- आष्टी तालुक्यात बिबट्याने मुलास पळवले

साडेचार वाजता प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः डॉक्टरांनी बाहेर येऊन त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली. आमदार भारत भालके यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार सुरू आहेत.

वाचा :- ‘या’ बंडखोर नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

रुबी हॉल क्लिनिकच्या बाहेर कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची प्रचंड गर्दी जमली आहे. पंढरपुरातूनही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते रुबी हॉलच्या बाहेर जमा झाले आहेत. प्रत्येक जण आमदार भारत भालके यांच्या निरामयतेची आणि त्यांच्या सुखरूप परतण्याची प्रार्थना करीत आहेत.

वाचा :- पंकजाताईंची ठाकरे सरकारवर जोरदार टीका

वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! वेश्याव्यवसायातील महिलांना मिळणार 5 हजार रुपये महिना