पंकजाताईंची ठाकरे सरकारवर जोरदार टीका
जनतेने बहुमत दिलं नसतानाही ते सत्तेत आहेत- पंकजाताईं
27 Nov :- भाजपा नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “जनतेने बहुमत दिलं नसतानाही ते सत्तेत आहेत. त्यामुळे सत्ता टिकवणं हे त्यांचं ध्येय आहे असं मला वाटतं,” असं त्या म्हणाल्या आहेत. आरक्षणाबाबत जे झालं आहे ते अत्यंत निराशाजनक आहे असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच धनगर आरक्षण विषय हाताळण्यात सरकारने गती घेतली नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
“एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वात प्रथम मी सरकारचं अभिनंदन करते. जनतेचे हित दुय्यम अशी परिस्थिती आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. “करोनाचा सामना करणं सरकारसमोर आव्हान आहे. सरकारसाठी हे नक्कीच त्रासदायक आहे. जनहितासठी आम्ही सहकार्याची भूमिका नक्की ठेवू,” असं आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलं.
वाचा :- ‘या’ बंडखोर नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी
पुढे त्या म्हणाल्या की, “मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या OBC आरक्षणाला धक्का लागू नये याबद्दल आम्ही सर्वांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या मराठा आरक्षणाबाबत Maratha Arkshan जे झालं आहे ते अत्यंत निराशाजनक आहे. मराठा तरुणांमध्ये, समाजात तीव्र संताप आणि खेद आहे.
वाचा :- आष्टी तालुक्यात बिबट्याने मुलास पळवले
सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र शासनाकडे त्यासंबंधी प्रस्ताव पाठवला पाहिजे”.सात दशकांपासून धनगर समाज आरक्षणाची वाट पाहत आहे. र चा ड करण्यासाठी त्यांना ७० वर्ष वाट पाहावं लागत आहे हे दुर्देवी. हा विषय हाताळण्यात ससरकाने गती घेतली नाही. विषयाला हातच लावलेला नाही,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! वेश्याव्यवसायातील महिलांना मिळणार 5 हजार रुपये महिना