‘या’ बंडखोर नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी
पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी करण्यात आली हकालपट्टी
27 Nov :- विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या Mahavikas Aaghadi Government) अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP)हकालपट्टी करण्यात आली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी चंद्रशेखर भोयर Chandrashekhar Bhoyarयांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे Shivajirao Garje यांनी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे.
वाचा :- आष्टी तालुक्यात बिबट्याने मुलास पळवले
या महा विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
वाचा :- बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची बदली!
वाचा :- बिलाविरोधात मनसेच्या राज्यव्यापी आंदोलनाला पोलिसांनी चिरडले