बीड

बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची बदली!

नूतन शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते आज होणार रुजू

गेल्या अनेक महिन्यांपासुन डॉ. थोरात यांच्या बदलीच्या सुरु असलेल्या चर्चेला आखेर पूर्णविराम मिळाला आहे. सर्वत्र कोरोनाचं महाकाय थैमान सुरु असताना बीड जिल्ह्यात कोरोना परिस्थिति आटोक्यात ठेवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि इतरत जिल्ह्यांपेक्षा बीड जिल्ह्यात सुरवाती पासून अजूनही कोरोना अंडर कंट्रोलच ठेवला असे बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची बदली झाली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासुन डॉ. थोरातांच्या बदलीच्या चर्चा रंगत होत्या आखेर डॉ. थोरातांची लातूर येथे बदली झाली आहे. नूतन शल्य चिकित्सक म्हणून डॉ. सूर्यकांत गिते आज आपला पदभार स्विकारणार आहेत. बदली झाल्यानंतर डॉ. थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

“कोरोनाच्या या काळात मला माझ्या जिल्ह्यात काम करायला मिळाल ते माझं भाग्य, जिथे कमी पडलो असतोल त्याबद्दल क्षमस्व” अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. डॉ. थोरातांच्या बदलीने बीड जिल्हावासि अस्वस्थ झाले आहेत. आणखी दोन-तीन महीने तरी बदली नको होती अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहेत.