बिलाविरोधात मनसेच्या राज्यव्यापी आंदोलनाला पोलिसांनी चिरडले
मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने मनसैनिकांची धरपकड
26 Nov :- वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पावित्रा घेत आज राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने मनसैनिकांची धरपकड झाली.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
‘सरकार गंभीर असेल तर दखल घेईल, अन्यथा सरकारला मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तर, ‘पोलिस आपले काम करतात. आम्ही आमचे काम करत आहोक, आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान, जर त्यांचे सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. अथवा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुढील भूमिका तयार आहे’, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
वाचा :-बिलाविरोधात मनसेच्या राज्यव्यापी आंदोलनाला पोलिसांनी चिरडले
दरम्यान, औरंगाबाद शहरात मनसेचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलकांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, ठाण्यातही मनसैनिकांची धरपकड सुरु झाली आहे. तर, पुण्यात पोलिसांनी मनसेचा मोर्चा रोखला आणि शेकडो मनसैनिकांना फरासखाना पोलिस ठाण्यात आणले.
वाचा :- वीज बीलाबाबत अशोक चव्हाणांनी केला धक्कादायक खुलासा
वाचा :- निर्बंध वाढणार! केंद्र सरकारच्या कोरोना बाबत नव्या गाइडलाइन्स