हजारो युवकांना रोजगार देणारा ‘कर्मवीर’ काळाच्या पडद्याआड
सकाळी 10 वाजता नामलगाव येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
26 Nov :- संपूर्ण मराठवाड्यावर आज शोककळा आली आहे. कारण हजारो युवकांना रोजगार निर्मण करून देणाऱ्या कर्मवीराची प्राणज्योत मालवली आहे. सहकार व बॅकींग क्षेत्रात स्वकर्तृत्वावर नावलौकिक प्राप्त करून ज्यांनी या बीड जिल्ह्याला उद्योगाचं बाळकडू पाजलं असं औद्योगिक,सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,व्यापार, सहकार अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची अमीट छाप उमटवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व छत्रपती शाहू महाराज बँकेचे सर्वेसर्वा अर्जुनराव जाहेर पाटील यांचे मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान निधन झाले.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ७६ वर्षे होते. आज त्यांच्या पार्थीवावर नामलगाव नजीक त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. जाहेर आप्पा म्हणून ते सर्वत्र परिचीत होते. गेल्या पाच ते सहा दशक भरात त्यांनी मराठा समाजासह बहुजन समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्रासह सहकार क्षेत्रात यशस्वी करण्यासाठी वेळोवेळी प्रेरणा दिली होती. वँकेच्या माध्यमातून राज्यभर अनेक शाखा आहेत.
वाचा :- मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार नको- पंकजाताई
राज्यस्तरीय अर्बन बँकेच्या फेडरेशनचे ते अध्यक्ष असून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास जाहेर आप्पांची प्राणज्योत मालवली.
वाचा :- वीज बीलाबाबत अशोक चव्हाणांनी केला धक्कादायक खुलासा
आज सकाळी दहा वाजता नामलगाव येथील त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, बैंक कर्मचारी, अधिकारी, शिक्षक तसेच वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे पदाधिकारी यासह सर्वसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाहेर अप्पांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण बीड जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दै. झुंजारनेता परिवाराकडून अर्जुनराव जाहेर पाटील(जाहेर अप्पां) यांना भावपूर्ण श्राद्धांजली
वाचा :- निर्बंध वाढणार! केंद्र सरकारच्या कोरोना बाबत नव्या गाइडलाइन्स