बीड

गेवराईत बायपासवर भीषण अपघात

चार जण जागीच ठार तर एक जण जखमी

26 :- सोलापूर – औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपास जवळील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठीमागे झालेल्या कार अपघातात चार जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवार दि.२६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

दरम्यान लातूर येथून औरंगाबादकडे जात असलेल्या MH-46 B-9700 या कार मधून जात चालकाचा ताबा सुटून ही कार डीवायडरला धडकून रस्त्याच्या पलीकडे जाऊन औरंगाबाद कडून बीडकडे येणाऱ्या टँकर क्रमांक – GJ – 16 AU – 2475 ला धडकून या अपघातात वंचित आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह संतोष भिंगे,सुभाष भिंगे,महादेव सकटे यांचा मृत्यू झाला तर राम भिंगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील दीप हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

वाचा :- मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार नको- पंकजाताई

या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिस ठाण्याचे पो.नि. चोबे,सपोनि संदीप काळे,पो.कॉ.खरात,राठोड,चव्हाण,वरकटे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

वाचा :- वीज बीलाबाबत अशोक चव्हाणांनी केला धक्कादायक खुलासा