महाराष्ट्र

वीज बीलाबाबत अशोक चव्हाणांनी केला धक्कादायक खुलासा

अशोक चव्हाण यांनी दिली कबुली

26 Nov :- राज्यात वाढीव वीज बिलावरुन विरोधकांनी रान उठवलं आहे. मनसे तर आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे. अशातचं एक धक्कादायक खुलासा कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. प्रक्रिया फोलो करणं आवश्यक होतं. तसं झालं नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

वाचा :- मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार नको- पंकजाताई

तिन्ही वीज कंपन्याही कुणाच्या तरी ग्राहक आहेत. कोरोनाच्या काळात आलेल्या तीन महिन्यांचे वीज देयके कुणाला जास्त आले असेल तर तीन हफ्ते पाडून आणि कुणी एकत्र भरत असेल तर 2 टक्के सवलत देऊ अशा तरतुदी केल्या आहेत. याला पैसा लागतो, पैशाचे सोंग घेता येत नाही. माफीचा निर्णय राज्य सरकारचा आहे.

वाचा :-  निर्बंध वाढणार! केंद्र सरकारच्या कोरोना बाबत नव्या गाइडलाइन्स

कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे आम्हाला थोडे माघारी यावे लागले, अशी प्रतिक्रिया उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. संविधान दिनानिमित्त नागपुरातील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत बोलत होते.

वाचा :-  केंद्र सरकारने घेतले आज ‘हे’ 3 मोठे निर्णय

वाचा :-  पंकजाताईंनी केला धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप