बीड

पंकजाताईंनी केला धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आत्म्याला त्रास देण्याचे काम काही लोकं करत आहेत

25 Nov :- ‘वैद्यनाथ साखर कारखान्या संदर्भ अपप्रचार केला जात आहे. हा कारखाना चालू करण्यासाठी मला कर्ज मिळू नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले. हे करून स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आत्म्याला त्रास देण्याचे काम काही लोकं करत आहेत’, असा आरोप भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

वैद्यनाथ साखर कारखाना लि.पांगरी येथे 20 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.’हा मुंडे साहेबांचा कारखाना आहे. मी कोणीच नाही. मी मात्र शुन्य आहे, मात्र जे माझ्यावर टीका करतात त्यांनी कधी मोळी तरी टाकली आहे का? असं म्हणत पंकजा यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना सवाल केला आहे.

वाचा :- उद्धव ठाकरेंना प्रशासन चालवता येत नाही. ते केवळ पक्ष चालवू शकतात

‘वैद्यनाथ साखर कारखान्याबद्दल अपप्रचार केला जात आहे. हा कारखाना चालू करण्यासाठी मला कर्ज मिळू नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले. परळी नगर पालिका ज्या पद्धतीने चालते, त्या पद्धतीने हा कारखाना नटबोल्ट विकून खावे, अशी ज्यांची अपेक्षा आहे. हे करून स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आत्म्याला त्रास देण्याचे काम काही लोक करत आहेत, अशी टीकाही पंकजा यांनी केली.

वाचा :- उद्धव ठाकरेंनी केली मोदींकडे राज्यातील भाजप नेत्यांबद्दल तक्रार

कारखाना क्षेत्रात 450 लाख टन ऊस आहे. त्याचे योग्य गाळप करून चांगली रिकेव्हर करणे हा उद्देश आहे. आता राजकारण करण्याचे दिवस संपले असून आता फक्त शेतकऱ्यांचे हित पहा, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. या कार्यक्रमास साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकर्ते, तथा शेतकरी वर्ग उपस्थित होते.

वाचा :- त्यांनी मागेही सांगितले होते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’- शरद पवार