सिनेमा,मनोरंजन

अन दत्ता बाई संतापल्या!

बॉलीवूडमधील निर्मात्यांवर संताप व्यक्त करत केला थेट सवाल

‘आशिक बनाया आपने’ या गाजलेल्या सुपरहिट चित्रपटातून मादक सौंदर्याचे प्रदर्शन करत लोकप्रिय झालेली अभिनेत्री तनुश्री दत्ता आल्पदिवसांतच हिंदी चिञपट सृष्टीत उंच यशाच्या शिखरावर पोहचली होती. हिंदी चिञपट सृष्टीत तनुश्रीच्या मागणीला चांगलाच वेग आला होता. ढोल, रकीब, आपार्टमेन्ट, गुड बॉय बॅड बॉय, स्पीड सारखे अनेक चित्रपटांमध्ये तनुश्रीने भूमिका साकारली. प्रेक्षकांनीही भरभरून तनुश्रीच्या चित्रपटांना प्रतिसाद दिला. मात्र हिंदी चित्रपट सृष्टीत आल्पदिवसांत मिळालेलं यश तनुश्रीला अधिक काळ टिकवता आले नाही. आणि तनुश्री हळूहळू हिंदी चित्रपट सृष्टीच्या बाहेर पडत गेली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

काही दिवसांपूर्वी तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप लावला होता. Me Too प्रकरण गाजल्याने तनुश्री पुन्हा चांगलीच चर्चेत आली होती. अनेक दिवसांनंतर आता पुन्हा तनुश्री चर्चेत आली आहे. यावेळी तनुश्री चिञपट निर्मात्यांवर चांगलीच संतापली आहे. तिने बॉलीवूडमधील निर्मात्यांवर संताप व्यक्त करत थेट सवाल केला आहे. अभिनेता नाना पाटेकर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. फिरोज नाडियाडवाला यांच्या आगामी वेब सीरिजमध्ये नाना अभिनय करताना दिसतील अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या या पुनरागमनावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने संताप व्यक्त केला आहे.

वाचा :- ‘लव्ह जिहाद’ विरूद्धच्या कायद्यावर शिक्कामोर्तब

नानांसारख्या व्यक्तीला निर्माते काम कसं देऊ शकतात? असा सवाल तिने केला आहे. हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत लैंगिक गैरवर्तणुक केली होती, असा आरोप तनुश्री दत्ता हिने केला आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने त्या प्रकरणाचा उल्लेख पुन्हा एका नाना पाटेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

वाचा :- कांगारू संघास पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज!

तनुश्री म्हणाली, “नाना पाटेकर यांनी मला प्रचंड मानसिक त्रास दिला. त्यांच्यामुळे माझं फिल्मी करिअर संपलं. काही वर्ष मी नैराश्येत देखील होते. स्त्रियांचा अनादर करणाऱ्या या व्यक्तीला बॉलिवूडमध्ये पुन्हा काम देऊ नये. निर्मात्यांनी नाना पाटेकर यांना पाठिंबा देऊ नये. या देशातील लोक सुशांतला न्याय मिळावा यासाठी प्रशासन व्यवस्थेशी लढले. परंतु मला मात्र कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. असे आरोप करत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर टीका केली.”

वाचा :- कोरोना लसी बाबत पंतप्रधान मोदींनी दिली महत्वपूर्ण माहिती