राजकारण

उद्धव ठाकरेंना प्रशासन चालवता येत नाही. ते केवळ पक्ष चालवू शकतात

उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत तर ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत

25 Nov :- राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार शाब्दिक हल्ले होत आहेत. विरोधी पक्षनेते महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करताना दिसत आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनाचा काय संबंध? असा थेट सवाल करत उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत तर ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत, असं टीकास्त्र देखील चंद्रकांत पाटील यांनी सोडलं आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

प्रशासन चालवणं ही सोपी गोष्ट नाही. उद्धव ठाकरेंना प्रशासनाशी संबंधित शंभर प्रश्न विचारले तर त्यांना उत्तरं देता येणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरसंधान साधलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांना प्रशासन चालवता येत नाही. ते केवळ पक्ष चालवू शकतात. कारण ते कधी साधे नगरसेवक झाले नाही, आमदार आणि खासदार तर दुरची गोष्ट. राज्याचं प्रशासन चालवताना कोर्टात हजार प्रश्न घेऊन बसावं लागतं, संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न हाताळण्याचे आदेश द्यावे लागतात. प्रशासनावर वचक असणं ही वेगळी बाब आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

वाचा :- पंकजाताईंनी साधला पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा!

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षावरच कायम कंट्रोल ठेवला. त्यांनीही कधी निवडणूक लढवली नाही. बाळासाहेबांनी जो नियम पाळला. तो उद्धव ठाकरेंनी पाळला नाही. एकदम अंगावर जबाबदारी पडल्यावर असं होतं. त्यामुळेच राज्यातील प्रश्न सोडवण्यात त्यांना सपशेल अपयश आलं आहे, असाही टोला चंद्रकांतदादांनी यावेळी लगावला.

वाचा :- ‘लव्ह जिहाद’ विरूद्धच्या कायद्यावर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही समोरासमोर बसू त्यांनी केवळ ‘क्रॉस सबसिडी’ म्हणजे काय याचा अर्थ सांगावा. एवढं नाही तर त्यांनी पुस्तकं पाहून उत्तरं द्यावीत, असं आव्हान चंद्रकांतदादांनी उद्धव ठाकरेंनी दिलं. पण कोणत्या पुस्तकात उत्तर आहे, हे देखील उद्धव ठाकरेंना सांगता येणार नाही, असा टोलाही यावेळी चंद्रकांतदादांनी लगावला.

वाचा :- उद्धव ठाकरेंनी केली मोदींकडे राज्यातील भाजप नेत्यांबद्दल तक्रार

वाचा :- त्यांनी मागेही सांगितले होते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’- शरद पवार